अहिल्याबाईंनी बांधलेल्या बारवांकडे दुर्लक्ष

May 31, 2016 3:33 PM0 commentsViews:

31 मे : सलग तीन वर्ष कमी पाऊस पडल्याने राज्यात तीव्र दुष्काळ पडलाय मात्र, अहमदनगर जिल्ह्यात अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या काळात ज्याठिकाणी मुक्काम केला त्या ठिकाणी बारव बांधल्या आहेत. जामखेड तालुक्यातील चौंडीमध्ये त्यांचा जन्म झाला. या भागातील हळगाव याठिकाणी ही बारव बांधली होती या विहिरीच्या पाण्यावर 100 एकर जमीन ओलीताखाली येत असे. मात्र या परिसरातील जमिनी विकल्या गेल्याने बारवाजवळच 4 ते 5 विहिरी खोदल्याने या बारवाचे पाणी गेलं आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा