महालक्ष्मीच्या रथाला चांदीची झळाळी

March 29, 2010 2:00 PM0 commentsViews: 3

29 मार्चकरवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या रथोत्सवासाठी यावेळी चांदीचा रथ बनवण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या काळात हा रथ सागवानापासून बनवला होता. यामुळे या रथाला आता चांदीची झळाळी प्राप्त होणार आहे. भक्तांच्या देणगीतून मिळालेली साडेचारशे किलो चांदी या रथासाठी वापरण्यात आली आहे. हा रथ बनवण्यासाठी 1 वर्ष लागले. अतिशय सुंदर अशी हेमाडपंथी डिझाईन्स यावर रेखाटण्यात आली आहे. येत्या 30 तारखेपासून हा रथ करवीरकरांना पाहायला मिळणार आहे.

close