राज्यात 7 जूनपर्यंत होणार मान्सूनच आगमन, स्कायमेटचा अंदाज

May 31, 2016 9:18 PM0 commentsViews:

506513982-monsoon1_6

मुंबई – 31 मे :  दुष्काळाचा प्रचंड मार सहन करत असलेल्या महाराष्ट्रामध्ये येत्या 5 ते 6 दिवसांत रिमझीम पाऊस पडेल असा अंदाज, स्कायमेटनं वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून गोव्याच्या दिशेने मान्सून सरकतोय. त्यामुळे 7 जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटचे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ मकरंद कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरात पावसाला अनुकूल बदल दिसून येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत वाढलेले तापमान आणि हवेतील वाढलेले बाष्पाचे प्रमाण यामुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, कोकणात सरासरीपेक्षा 15टक्के जास्त तर विदर्भात 6 टक्के जास्त पाऊस अपेक्षीत आहे. तर  मराठवाड्यात सरासरी पाऊस होईल अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली आहे. तसंच जूनमध्ये कमी पाऊस होईल मात्र, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होणार असून ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व धरणं भरतील असा आंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा