मनसे उमेदवाराच्या अपहरणाचा संशय

March 29, 2010 2:03 PM0 commentsViews: 1

29 मार्चअंबरनाथमध्ये मनसेच्या एका उमेदवाराचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. मारुती लक्ष्मण माडीवाल असे त्यांचे नाव आहे. वॉर्ड क्रमांक 11 मधून माडीवाल यांनी मनसेकडून निवडणुकीचा फॉर्म भरला होता. महापालिकेच्या निवडणूक वादामुळे त्यांचे अपहरण झाल्याचा संशय आहे. अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close