‘तन्मय भट्टला ओळखत नाही’, वादग्रस्त व्हिडीओवर लतादीदींनी मौन सोडलं

May 31, 2016 6:19 PM0 commentsViews:

tanmay bhat1213
31 मे : एआयबी कॉमेडियन तन्मय भट्टने भारतरत्न लता मंगशेकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर केलेल्या व्हिडिओमुळे सर्वच स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या संपूर्ण प्रकारावर अखेर लता मंगेशकर यांनी आपले मौन सोडलंआहे.

एका बेवसाईटला मुलाखत देताना लता मंगेशकर म्हणाल्या की, मी हा व्हिडिओ पाहिलेला नाही आणि तो मला बघण्याची इच्छा देखील नाही. तसंच मी यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. आणि महत्वाचं म्हणजे तन्मय भट्ट कोण आहे? मी त्याला ओळखतही नाही.

दरम्यान, भारतरत्न लता मंगेशकर आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे चेहरे मॉर्फ करून यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिपण्णी केल्यामुळे तन्मयविरोधात संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे ट्विटरवर तन्मयवर टीका होत असताना मनसे आणि भाजप या राजकीय पक्षांनी तन्मयवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा