वरळीत कावीळीची साथ

March 29, 2010 2:06 PM0 commentsViews: 5

सीटिझन जर्नलिस्ट अस्मिता एडगे29 मार्च मुंबईतील वरळीमध्ये दूषित पाण्यामुळे कावीळीची साथ पसरली आहे. गेल्या 15 दिवसांत यात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 14 पेशंट कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. येथील रहिवाशांनी बीेएमसीकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. पण त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. गेल्या सहा महिन्यांपासून वरळीतील लोकांना अशा प्रकारचे दूषित पाणी प्यावे लागत आहे.एकीकडे मुंबईत पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर दुसरीकडे वरळीती नागरिकांना नाईलाजाने दूषित पाणी फेकून द्यावे लागत आहे. आमच्याकडे महापालिका कधी लक्ष देणार, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.

close