‘दारिद्र्य रेषेचे नवीन निकष ठरवा’

March 29, 2010 2:11 PM0 commentsViews: 17

29 मार्चदेशात दारिद्र्य रेषेचे नवीन निकष ठरवण्याची प्रक्रिया 2007 मध्ये सुरू व्हायला हवी होती. पण ती अजूनही सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे दारिद्र्य रेषेचे 2002 ला ठरवलेले निकषच अजून वापरले जात आहेत. यासाठीचे नवीन निकष ठरवण्यासाठी अन्न अधिकार अभियान आणि नवमहाराष्ट्र युवा अभियान यांनी एक परिषद आयोजित केली होती. डॉ. एन. डी. पाटील आणि बाबा आढाव यांनी या परिषदेत मार्गदर्शन केले. दारिद्र्य रेषेचे नवीन निकष ठरविण्यासाठी सरकारने सक्सेना समिती आणि तेंडुलकर समिती अशा दोन समित्याही नेमल्या होत्या. पण सरकारने त्यांच्या अहवालांचा अजून विचार केलेला नाही. दारिद्र्य रेषेचे नवीन सर्वेक्षण लवकरात लवकर सुरू करावे, शहरी दारिद्र्य रेषेची प्रक्रियाही सुरू करावी, अन्न, रोजगार, शिक्षण, आरोग्य सर्वांना पुरवणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे, त्यामुळे या योजना दारिद्र्यरेषेचे निकष लावून लक्ष्याधारीत न करता सर्वांसाठी असायला हवेत. अशा प्रकारच्या मागण्या असलेला प्रस्ताव तयार करुन तो सरकारला सादर करण्यात येणार आहे.

close