अबब, साडेपाच कोटींची बाईक !

May 31, 2016 7:02 PM0 commentsViews:

जगातील सर्वात महाग बाईकची किंमत किती असू शकते? 10 लाख,20 लाख, 50 लाख…जास्तीत जास्त 1 करोड…परंतू या बाईकची किंमत आहे तब्बल 5.53 कोटी रुपये…फोटोमध्ये दिसत असणारी बाईक ही हार्ले डेव्हिडसनची आहे. हॉर्ले डेव्हिडसने आपल्या या बाईकवर त्याने सोन्याचा एक थर चढवला आहे. 5.53 कोटीची किंमत ऐकून भले तुम्हाला शॉक लागला असेल पण, कंपनीचा दावा आहे की, बाईकवेड्यांसाठी ही किंमत काही जास्त नाही. डेन्मार्कच्या मोटरसायकल निर्माता कंपनी लॉज जेनसनने या बाईकला तयार केलं आहे. या बाईकला मागील वर्षी जर्मनीने सगळ्यांनं समोर आणले होतं. अशा या गोल्डन बाईकची किंमत आहे फक्त 5.53 कोटी…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close