साचलेल्या पाण्यात पोहणार्‍या मुलाचा बुडून मृत्यू

March 29, 2010 2:15 PM0 commentsViews: 1

29 मार्चमुंबईतील विक्रोळीमध्ये एका साचलेल्या पाण्यात पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे.विक्रोळीतल्या टागोर नगरला असलेल्या मोकळ्या जमिनीवर असलेल्या खड्यात पाणी साचले आहे. या पाण्यात काही मुले पोहत होती. त्यापैकी जवळच्यात झोपडपट्टीत राहणारा फैजल हा 12 वर्षांचा मुलगा पाण्यात बुडाला. त्यानंतर त्याच्यासोबत असणार्‍या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर रस्त्यावरच्या एका मुलाने त्याला पाण्यातून बाहेर काढले. पण तोपर्यंत फैजलचा मृत्यू झाला होता.

close