वर्धा : पुलगाव स्फोटात मृतांचा आकडा 18 वर

June 1, 2016 9:51 AM0 commentsViews:

wardhaवर्धा 01 जून : वर्ध्यामध्ये पुलगावच्या लष्कराच्या दारूगोळा भांडार आग प्रकरणात मृतांचा आकडा आता 18 वर पोहोचलाय. आज 2 मृतदेह सापडले. एक मृतदेह हा पाण्याच्या टाकीत सापडला.

भारतीय लष्कराच्या पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारात सोमवारी पहाटे 2 ते 2.30 त्या सुमारास स्फोट झाला. स्फोटामुळे आग पसरली. या दुर्घटनेत 14 जवान आणि 2 लष्करी अधिकार्‍याचा समावेश आहे. यात 19 जण जखमी झाले आहे. स्फोटानंतर लागलेली आग इतकी भीषण होती की, कॅम्प परिसरालगतच्या 15 कि.मी. परिघातील गावात या प्रभाव जाणवला. खबरदारी म्हणून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. या स्फोटांमुळे स्थानिक लोकांमध्ये घबराटीचं वातावरण कायम आहे. दरम्यान मृत जवानांचे पार्थिवं त्यांच्या त्यांच्या मुळगावी पाठवून देण्याची व्यवस्था करण्यात आलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा