एकनाथ खडसे दोन दिवस मुक्ताईनगर मुक्कामी

June 1, 2016 11:44 AM0 commentsViews:

khadse_sot3जळगाव – 01 जून : नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसुलमंत्री एकनाथ खडसे सध्या आपल्या गावी म्हणजे मुक्ताईनगर इथंच आहेत. मुक्ताई देवीच्या यात्रेनिमित्त खडसे आपल्या गावी आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी ते घेत असून उद्याही त्यांचा मुक्काम मुक्ताईनगरलाच राहणार असणार असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, मंगळवारी त्यांनी लाल दिव्याची गाडी वापरण टाळण्याने अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यावर त्यांनी आपण नाराज नसल्याचा खुलासा केलाय. आणि मुक्ताई देवीच्या यात्रेला यायचं असल्यानेच मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याचं समर्थनही केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा