अधिवेशनात बजेटवर चर्चा

March 29, 2010 2:52 PM0 commentsViews: 10

29 मार्चगेल्या गुरूवारी राज्याचे बजेट विधिमंडळात मांडण्यात आले. 7654 कोटीच्या या तुटीच्या बजेटवर आज विधानसभा आणि विधानपरिषदेत चर्चा करण्यात आली.ही चर्चा उद्याही सुरू राहाणार असून उद्या संध्याकाळी सरकारतर्फे या चर्चेत उपस्थित केलेल्या मुद्दयांवर उत्तर देण्यात येणार आहे. आजच्या चर्चेत राज्यावरच्या वाढत चाललेल्या कर्जाचा मुद्दा चर्चिला गेला. कर्जाचा डोंगर वाढून 2 लाख 10 हजार कोटींवर पोहोचला आहे. तसेच दोन हजार कोटींचे व्याज सरकारला भरावे लागते. त्यामुळे राज्य आर्थिक दिवाळखोरीत गेल्याची टीका विरोधकांनी केली.अधिवेशनात इतर कोणत्या विषयांवर चर्चा झाली ते पाहूया – स्वाईन फ्ल्यू आटोक्यात नाहीराज्यात अजूनही स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू होत असल्याचे सरकारने मान्य केले आहे. विधानपरिषदेमध्ये याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी उत्तर दिले. 10 मार्च 2010 पर्यंत राज्यात स्वाईन फ्ल्यूमुळे 383 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर 6 हजार 459 जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली आहे. ही साथ आटोक्यात यावी म्हणून परदेशी प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे.जैतापूरच्या प्रकल्पाला विरोधजैतापूरच्या अणुउर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. पण या प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प राबवला जाईल असे उर्जामंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले. शिवसेना आमदार रामदास कदम, किरण पावसकर, परशुराम उपरकर यांनी याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना 20 प्रकल्पाग्रस्तांनी 22 जानेवारीला 9लाख 74 हजार 656 रुपये इतकी रक्कम स्विकारली आहे. पर्यावरणाबद्दलच्या गोष्टी तपासूनच हा प्रकल्प राबवला जाईल, असे पवारांनी सांगितले.'आरे'च्या चौकशीचे आश्वासन सुप्रसिद्ध आरे दूध डेअरीच्या एक हजार 811 स्टॉल्सच्या निविदा कमी दराने खाजगी कंपन्यांना देण्यामुळे डेअरीचे आर्थिक नुकसान झाले आहे का? याबाबत सरकारी पातळीवर चौकशी करू, असे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी विधानसभेत दिले. आरे डेअरीच्या भूखंडावर अनेकांचा डोळा आहे. त्यामुळेच दुधाचा खप घटवण्याचे षड्‌यंत्र जाणीवपूर्वक केले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.मराठीचा ठराव मंजूरराज्यातील केंद्रसरकारची कार्यालये, महामंडळे आणि इतर तत्सम संस्थांमध्ये मराठी भाषेचा वापर वाढवण्यासंबंधीचा ठराव विधानसभेत मंजूर झाला. सरकारच्या वतीने अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी हा त्रिभाषा ठराव मांडला. तो एकमताने मंजूर झाला. हा ठराव आठवड्याभरापूर्वीच विधानपरिषदेत मंजूर झाला होता.मफतलालचे पुनर्वसनठाणे महापालिका हद्दीतल्या मफतलाल कंपनी परिसरातील आतकोनेश्वर नगर, वाघोबा नगर, घोलाई नगर, भास्करनगर, पाऊंडपाडा या झोपडपट्टीतल्या रहिवाशांचे पुनर्वसन मफतलाल कंपनी परिसरातल्या भूखंडावरच करण्यात येईल. तोवर या झोपडपट्टीवासियांना सुविधा पुरवण्याचे आदेश ठाणे महापालिकेला देण्यात आले आहेत. ही माहिती नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी विधानसभेत दिली.

close