आजपासून हे होणार महाग

June 1, 2016 3:10 PM0 commentsViews:

सेवा करात आजपासून कृषी कल्याण अधिभाराची भर पडणार आहे. त्यामुळे कालपर्यंत तुम्ही 14.5 टक्के सेवा कर भरत होतात, तो आजपासून 15 टक्के झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात या अधिभाराची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आजपासून होत आहे. त्यामुळे ज्या ज्या वस्तूंवर आतापर्यंत तुम्ही 14.5 टक्के सेवा कर देत होता त्यावर आता 15 टक्के कर द्यावा लागणार आहे. हाच कर दोनवर्षांपूर्वी 12.30 टक्के होता.

विमा
बँकिंग सेवा
वीज आणि मोबाईलचे बिल
बँक ट्रान्सफर
आईएसपीस
एसएमएस अलर्ट
सिनेमा तिकीट
विमान प्रवास
हॉटेलमध्ये जेवण
स्पा-सलून
आईटी
केटरिंग
नवीन घर खरेदी
वाहन खरेदी
हेल्थ पॉलिसी
टुरिस्ट कंपन्यांकडून प्रवास
लग्न सोहळा आयोजन कंपन्यांकडून सेवा
लग्नासाठी हॉल
रेल्वेचं ऑनलाईन तिकीट खरेदी
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा