मुख्यमंत्री विरूद्ध कृपाशंकर

March 29, 2010 3:03 PM0 commentsViews: 1

आशिष जाधव, मुंबई29 मार्चविधानभवनाबाहेर आज चर्चा होती ती काँग्रेस विरुद्ध अमिताभच्या वादाची.वांद्रे वरळी सी लिंकच्या वादात अमिताभ बच्चन यांना अडकवण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांना नडणार असेच दिसत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आता कृपाशंकर सिंग यांच्याविरोधात दंड थोपटल्याची जोरदार चर्चा आहे.वांद्रे वरळी सिलिंकच्या वादात महानायक अमिताभ बच्चन यांना नाहक अडकवण्यात आले. पण हा नसता उपद्‌व्याप काँग्रेस हायकमांडसह इतर कोणत्याही नेत्याला रुचला नाही. एवढेच नाही तर राष्ट्रवादीने पण याची निंदा केली.या प्रकरणामुळे काँग्रेसमधील सगळेच गट कृपाशंकर यांच्या विरोधात गेलेत. आणि नुसतेच विरोधातच नाहीत तर चांगलेच सक्रीय झालेत. गेल्या काही वर्षातील अमिताभ आणि कृपाशंकर एकत्र असलेले अनेक फोटो कृपाशंकर यांच्या आत्मचरित्रात आहेत. तेच आता हायकमांडकडे पोहचवण्यात आलेत.खरे तर आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कृपाशंकर यांच्या विरोधात दंड थोपटलेत. त्यांनी गुरूदास कामत आणि मुरली देवरा यांच्यासारख्या काँग्रेसमधील कृपाशंकर यांच्या विरोधकांशी हातमिळवणी केली आहे. एकूणच काय तर कृपाविरोधी लाट लवकर दिल्लीत पोहोचावी याची खबरदारी राज्यातील प्रत्येक काँग्रेसचा नेता घेताना दिसत आहे.

close