विद्यापीठातील गैरकारभारांची चौकशी होणार

March 29, 2010 3:07 PM0 commentsViews: 1

29 मार्चमुंबई विद्यापीठातील सर्व गैर कारभारांची चौकशी करण्यात येईल आणि त्याचा रिपोर्ट राज्य सरकारला देण्यात येईल, अशी माहिती उच्चतंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. मुंबई विद्यापीठाच्या गैरकारभारासंबंधी राज्य सरकारला माहिती देणारी तसेच त्यावरच्या उपाययोजनांची चर्चा करणारी एक लक्षवेधी सूचना आज विधानपरिषदेत विरोधकांतर्फे मांडण्यात आली होती. त्याला उत्तर देताना टोपे यांनी ही घोषणा केली. त्याचबरोबर नॅकचे मानांकन मिळवण्यासंदर्भात विद्यापीठाच्या प्रशासनाची उदासिनताही या लक्षवेधीद्वारे शिवसेनेचे आमदार डॉ. दीपक सावंत यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली.

close