भुजबळांची नाशकातली 23 एकर जमीन सरकारजमा

June 1, 2016 6:46 PM0 commentsViews:

Chagan-Bhujbal
01 जून :  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ सध्या ऑर्थर रोड तुरूंगात आहेत. मात्र, त्यांना आणखी एका मोठ्या धक्क्याला सामोरं जावं लागत आहे. भुजबळांच्या मालकीची नाशिकमधील गंगापूर भागातील 23 एकर जमीन सरकारजमा करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थेसाठी भुजबळांना ही सरकारी जमीन देण्यात आली होती. महसूल विभागाने ती जप्त केली आहे. या जमिनीचं बाजारमूल्य 40 कोटींच्या घरात असल्याची माहिती मिळत आहे. मंत्रालयातील पथकानं ही थेट कारवाई केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा