कौमार्य परीक्षा प्रकरणी मुलाने मागितली ‘ती’ची माफी!

June 1, 2016 11:07 PM0 commentsViews:

êÖêËêÖêêËÖêy

01 जून :  शिर्डीमधल्या कौमार्य परीक्षा प्रकरणी संबंधित नवर्‍यामुलाने पीडित मुलीची माफी मागितल्यानंतर वधू-वराने पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कौमार्य परीक्षेवरून मोडलेला संसार आता पुन्हा सावरला आहे.

शिर्डीमधल्या या एका गंभीर घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. पण त्यापेक्षाही हे कंजारभाट जातपंचायतीचा जाच अजूनही कसा सुरूच आहे? ते या प्रसंगातून समोर आलं. विशेष म्हणजे ही मुलगी पोलीस भरतीसाठी ती प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती ट्रेनिंगही घेत होती.

शिर्डीमध्ये 22 मे रोजी या वधू-वरांचा विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी पीडित मुलाची जातपंचायतीच्या आदेशावरून कौमार्य चाचणी घेण्यात आली. या चाचणीत वधू अपयशी ठरल्याने तिच्याशी कायमचे नातं तोडण्याचे आदेश पंचायतीने दिले. त्यानंतर नववधूला लग्नघरीच सोडून वर्‍हाडी निघून गेले.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे आणि रंजना गवांदे यांना मुलीच्या घरच्यांकडून ही बाब कळली. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणले.

हे प्रकरण राज्यभरात गाजलं आणि त्यानंतर नवर्‍या मुलानं माफी मागितली आहे. तसंच जातपंचायत बंद झाली पाहिजे अशी मागणी दोघांनीही केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा