भिवंडीत महेश डाईंग कंपनीला आग

June 2, 2016 9:05 AM0 commentsViews:

मुंबई – 02 जून : भिवंडी शहरातल्या न्यू कणेरी भागात महेश डाईंग या कंपनीला भीषण आग लागलीये. कोट्यवधींचं नुकसान झालं असून कारखान्याचे दोन्ही मजले जळून खाक झालेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.bhuvandi3

महेश डाईंग ा कंपनीला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग विझवण्यासाठी भिवंडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर महापालिकाच्या अग्नी शामक दलाचे 9 बंब घटनास्थळी असून जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. महसूल विभागाचे आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. या कंपनीत कपड्यांवर प्रोसेस करण्याचं काम या केलं जातं असे. आता ही आग आटोक्यात येत असून अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा