धुळ्यात कचरा डेपोला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य

June 2, 2016 9:11 AM0 commentsViews:

धुळे – 02 जून : महानगर पालिकेच्या वडजाई रोडवरील कचरा डेपोला रात्री भीषण आग लागली. या आगीत डेपोतील कचरा मोठ्या प्रमाणात जळालाय. तसंच झाडांचंही मोठे नुकसान झाले आहे. मोठमोठाली झाडं या आगीच्या भस्मस्मात झाली.

dhule2आगीमुळे निर्माण झालेल्या धुराच्या लोटांमुळे जुन्या धुळे शहराचा परिसर पूर्णपणे धुराने व्यापला होता. रस्त्यावर पायी चालणे मुश्कील झाले होते. तब्बल एक ते दीड तास आगीचे तांडव सुरू असताना पालिकेचे अग्निशमन बंब उशिरा आले. चार बंबांनी ही आग आटोक्यात येत नव्हती. कचरा डेपोत असलेले मोठे वृक्ष या आगीत जळाले असून अश्या पद्धतीने या डेपोला वारंवार आग लावली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या आगीच्या घटनेमुळे जुने धुळे परिसरातील नागरिक हैराण झाले असून दोषी अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा