त्याच्या ‘तिसर्‍या’ डोळ्यात कैद झाले लोकलचे स्टंटबाज !

June 2, 2016 11:55 AM0 commentsViews:

सूरज ओझा, मुंबई – 02 जून : मुंबईची लाईफ लाईन लोकल आणि हौशी स्टंट मॅन यांचं जुळलेलं समीकरण हे अत्यंत धोकादायक आहे. आपण दररोज कित्येक जणांना लोकलमध्ये स्टंट करताना पाहिलं असेल, रात्रीच्यावेळी रिकाम्या लोकलमधून फिरणारे लोक कशाप्रकारे स्टंटबाजी करतात हा प्रकार मुंबईच्या एका चष्मेबहाद्दूर सुपरमॅननं त्याच्या चष्म्यात कैद केलाय. त्यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण कशाप्रकारे नियमांचं उल्लंघन करतात ते दिसतंय. हे सगळे स्टंट शूट करण्यासाठी दीपेश टंक यांनी खास अमेरिकेहून आणलेल्या कॅमेरा असलेला चष्मा मागवलाय. या मागचा त्यांचा उद्देश एकच आहे की, मुंबईतल्या रेल्वेच्या स्टंट मॅनला योग्य ती शिक्षा मिळायला पाहिजे.local_stant

लोकं सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जातो म्हणून घरातून निघाले आणि मुंबईत रेल्वेमध्ये जाऊन स्टंट करतात…काही मुलं स्केटिंग करताहेत…स्टंट करताहेत…पोलिसांना शिवीगाळ करताहेत…त्याला वैतागून पोलीस चालत्या ट्रेनवर काठी मारतो..मुंबईच्या एका चष्मेबहाद्दूर सुपरमॅननं ही सगळा प्रकार त्याच्या चष्म्यात कैद केलाय.

दुसर्‍या दृष्यामध्ये एक व्यक्ती स्टेशनवर उभं राहून बाजून जात असलेल्या ट्रेनमधल्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करतेय. तर हे लोकं एवढं करून थांबत नाहीत, तर ते स्टेशनवरच्या कँटीनमध्ये काम करणार्‍या लोकांनाही त्रास देताहेत. त्यांच्या वस्तू चोरून चालत्या ट्रेनमध्ये चढून निघून जातात.

dipak_tankआता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मुंबईचा हा सुपरमॅन कोण आहे. जो त्याच्या काळ्या चष्म्याचा वापर करून रेल्वेतल्या स्टंटमनची पोलखोल करतोय. त्याचं नाव आहे दीपेश टंक…हे सगळे स्टंट शूट करण्यासाठी दीपेशनं खास अमेरिकेहून कॅमेरा असलेला चष्मा मागवलाय. या मागचा त्यांचा उद्देश एकच आहे की, मुंबईतल्या रेल्वेच्या स्टंट मॅनला योग्य ती शिक्षा मिळायला पाहिजे…

मुंबईच्या लोकलमध्ये होणारे असे अनेक स्टंट आपल्या चष्म्यातल्या कॅमेर्‍यात कैद करून थांबवण्याचा प्रयत्न दीपेशनं केला आहे. मात्र एवढं सगळं करून, पोलिसांनी त्यांच्या खाकीचा धाक दाखवूनही हे प्रकार थांबताना दिसत नाहीत. त्यामुळं आता करायचं काय असा प्रश्न सगळ्यांपुढंच आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा