गुलबर्ग हत्याकांड प्रकरणी 36 जणांची निर्दोष मुक्तता, 24 दोषी

June 2, 2016 1:32 PM0 commentsViews:

अहमदाबाद – 02 जून : अखेर 14 वर्षांनंतर गुलबर्ग सोसायटी जळीत हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला आहे. 62 पैकी 36 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे तर 24 जणांना दोषी ठरवण्यात आलंय. 24 दोषींपैकी 11 जणांना अहमादाबाद हायकोर्टाने खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवलंय. 6 जूनला दोषींच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे.

gulbarg28 फेब्रुवारी 2002 मध्ये अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीत समाजकंटकांनी 69 लोकांना जिवंत जाळण्यात आलं होतं. या प्रकरणाची तब्बल 14 वर्ष कोर्टात सुनावणी सुरू होती. आज अहमदाबाद हायकोर्टाने आपला निकाल देत पुराव्याअभावी 36 जणांची निर्दोष मुक्तता केलीये. निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांमध्ये भाजपचे नगरसेवक पार्षद विपिन यांचाही समावेश आहे. तसंच ही घटना पूर्वनियोजित नव्हती असंही कोर्टाने नमूद केलं. या हत्याकांडात काँग्रेसचे नेते एहसान जाफरी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी जाकिरा जाफरी यांनी कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीये. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात याचिका दाखल करणार असं एहसान जाफरी यांनी स्पष्ट केलं. तर पीडितांचे वकिल एहसान व्होरा यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागतं केलं.

काय आहे हे प्रकरण

2002 मध्ये साबरमती एक्स्प्रेस अग्निकांडात 59 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीमध्ये संतप्त जमावाने 69 लोकांना जिवंत जाळलं होतं. या हत्याकांडात काँग्रेसचे नेते एहसान जाफरी यांचाही समावेश होता. या प्रकरणी एयआयटीने 73 लोकांना अटक केली होती. या प्रकरणाची वेगवेगळ्या तपास यंत्रणेकडून तपास कऱण्यात आला. अखेरीस सुप्रीम कोर्टाच्या नजरेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली होती. एसआयटीकडे गुजरातमधील 9 प्रकरण सोपवण्यात आली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा