27 टक्के आरक्षण ओबीसी महिलांना द्या

March 29, 2010 5:42 PM0 commentsViews: 2

29 मार्च33 टक्के महिला आरक्षणामधील 27 टक्के आरक्षण हे ओबीसी महिलांना मिळावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एका पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे. तसेच हे पत्र त्यांनी सोनिया गांधी आणि शरद पवार यांनाही पाठवले आहे. 27 टक्क्यांच्या आरक्षणाची मागणी करत असताना, त्यांनी मंडल आयोगाच्या शिफारशीची पुष्टी जोडली आहे. 1990 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या 9 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मंडल आयोगाच्या शिफारशींना मान्यता दिली होती. त्यानंतर 1992मध्ये केंद्र सरकारने त्या शिफारशी स्वीकारल्या होत्या. त्यानंतर काही राज्यांनी त्याला मान्यताही दिली होती, असा संदर्भही भुजबळांनी आपल्या पत्रात दिला आहे. 2011 मध्ये होणार्‍या जनगणनेमध्ये एसटी, एससीप्रमाणेच ओबीसींच्या जनगणनेसाठी वेगळी कॅटेगरी करावी, अशी मागणीही भुजबळांनी केली आहे.

close