खडसे निर्दोष असतील तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं -संजय राऊत

June 2, 2016 4:02 PM0 commentsViews:

02 जून : एकनाथ खडसे यांच्याबद्दल आम्हला सहानुभूती आहे. पण, एकनाथ खडसे निर्दोष आहेत असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी ते उघडपणे सांगायला हवं होतं अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली. तसंच जो न्याय सुरेशदादा जैन यांच्याबाबत खडसेंनी लावला तो न्याय स्वत:विषयी लावावा असा टोलाही राऊत यांनी लगावला.sanjay_raut3

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचं पद जाणार की राहणार याबद्दल चर्चेला ऊत आलंय. आतापर्यंत मौन बाळगुण असलेल्या मित्रपक्ष शिवसेनेनं आपली भूमिका अखेर मांडलीये. आयबीएन लोकमतशी बोलतांना संजय राऊत यांनी खडसे प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. खडसेंविषयी आम्हाला सहानुभूती आणि प्रेम आहे. पण खडसेंविषयी उठलेलं वादळ दुदैर्वी आहे.
त्यांच्यावर जे काही आरोप झाले आहे त्यांचं सत्य आज ना उद्या बाहेर येईल. पण खडसे निर्दोष आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल तर त्यांनी ते उघडपणे सांगायला हवं होतं असं परखड मत संजय राऊत यांनी मांडलं. आम्ही सत्तेतले वाटेकरू जरी असलो तरी मुळात सरकार हे भाजपचं आहे आणि हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे पक्षाची धुरा सांभाळत आहे त्यांनी भूमिका मांडणे गरजेच आहे. खडसे यांच्यासोबत आमचं शत्रूत्व नाहीये. पण जो न्याय सुरेशदादा जैन यांच्याबाबत खडसेंनी लावला तो न्याय खडसेंनी स्वत:विषयी लावावा असंही संजय राऊत म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा