एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळातून काढून टाका – पृथ्वीराज चव्हाण

June 2, 2016 4:06 PM0 commentsViews:

prithviraj chavan (1)

02 जून : महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम यांच्यातील कॉलप्रकरण हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंना राज्याच्या मंत्रिमंडळातून बरखास्त करावं, अशी मागणी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ खडसेंच्या मुद्द्यावरुन भाजप सरकारवर तोफ डागली.

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिमचा फोन येणं हा प्रकार अतिशय गंभीर आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असून केंद्रीय गृहमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरुन द्यावं, असं ते म्हणाले. तसंच एकनाथ ख़डसेंचा राजीनामा घेऊन, दोषी व्यक्तीवर राष्ट्रीय सुरक्षा भंग केल्याप्रकारणी गुन्हा दाखल करावा असंही चव्हाण म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा