सोनिया पुन्हा अध्यक्षपदी

March 29, 2010 5:48 PM0 commentsViews: 1

29 मार्चसोनिया गांधी आता पुन्हा राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी परतणार आहेत. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या नियुक्तीमुळे त्यांना आता कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळणार आहे. चार वर्षांपूर्वी लाभाच्या पदाचा वाद झाल्यानंतर सोनिया गांधींनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांतर ही राष्ट्रीय सल्लागार परिषद मोडीत काढण्यात आली होती.मध्यंतरी लाभाच्या पदांमधून या परिषदेचे अध्यक्षपद वगळण्यात आले. त्यामुळे सोनिया गांधींचा मार्ग मोकळा झाला होता. आता राष्ट्रीय सल्लागार परिषद पुन्हा अस्तित्वात येणार आहे आणि सोनिया गांधी या परिषदेच्या अध्यक्ष असतील.

close