खडसेंना भासतेय गोपिनाथ मुंडेंची उणीव?

June 2, 2016 5:45 PM0 commentsViews:

Khase poster231

02 जून : राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ आदरांजली व्यक्त करणारे पोस्टर्स मुंबईभर लावले आहेत. ‘असा नेता पुन्हा होणे नाही..’,’कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्त्व’ अशी वाक्य असणारं हे पोस्टर्स मुंबईत लावले गेले आहेत.

विशेष म्हणजे या पोस्टर्सवर भारतीय जनता पक्षाचा उल्लेख करण्यात आला नसून, केवळ महसुलमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच यावर ‘असा नेता पुन्हा होणे नाही’, ‘तुमची उणीव भासतेय’ तर ‘आठवण लोकनेत्याची’ अशी वाक्य छापण्यात आली आहेत. त्यामुळे या पोस्टर्सवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ खडसेंवर सध्या अनेक आरोप होते आहेत. मात्र, यादरम्यान भाजपमधून कुणी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं असल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे खडसे पक्षांतर्गत नाराज असल्याचीही चर्चा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा