खडसेंचा फैसला मोदी-शहांच्या कोर्टात

June 2, 2016 8:18 PM0 commentsViews:

Khadse bjp decidion

02 जून :  महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासंदर्भात जी प्रकरणे समोर आली आहेत. त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे दिला असून, आता पक्षश्रेष्ठीच पुढील निर्णय घेतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे खडसेंचे भवितव्य अमित शहा आणि पंतप्रधान मोदींच्या हाती असल्याचे स्पष्ट झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महसूलमंत्री एकनाथ खडसे विविध आर्थिक प्रकरणांमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी आप, शिवसेना, काँग्रेससह विविध पक्षांनी लावून धरली आहे. पक्षातून कुणाकडून खडसेंची पाठराखण न झाल्याने ते एकाकी पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजीनाम्याचा दबाव प्रचंड वाढला आहे.

अखेर अमित शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे खडसेंबाबतचा अहवाल तातडीने मागवला. फडणवीस यांनी आज भाजपच्या मुख्यालयामध्ये अमित शहा यांची भेट घेतली आणि सुमारे 40 मिनिटे बंद खोलीमध्ये त्यांच्याशी याप्रकरणी चर्चा केली. हा अहवाल अमित शहा आता पंतप्रधान मोदींसमोर मांडतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मिळते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा