पुन्हा ‘बिग बँग’चा प्रयोग

March 30, 2010 7:46 AM0 commentsViews: 15

30 मार्चजगाला अक्षरश: हादरवून सोडणारा एक वैज्ञानिक प्रयोग अवघ्या काही तासातच सुरू होत आहे. पृथ्वीची आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ब्रम्हांडाची निर्मिती कशी झाली, हे शोधून काढण्यासाठी आज स्वित्झर्लंडमध्ये बिग बँग प्रयोग केला जाणार आहे. यात अतिशय वेगाने प्रवास करणार्‍या प्रोटॉनच्या किरणोत्सर्गांना एकमेकांवर आदळवले जाणार आहे. भुयारांच्या या भूलभुलैयात, शास्त्रज्ञ शोधतायत, आकाशगंगेच्या जन्माचे गुपित. जगभरातून आलेले आठ हजार शास्त्रज्ञ इथे प्रयत्न करणार आहेत. बिग बँग नंतरचा क्षण पुन्हा निर्माण करण्याचा. हा प्रयोग यशस्वी झाला, तर ब्रम्हांडाविषयीच्या आपल्या ज्ञानात मूलभूत बदल होऊ शकतात

close