महानोरांचे लाईटबील महावितरण भरणार

March 30, 2010 8:32 AM0 commentsViews: 7

30 मार्चज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांचे 23 हजार 874 रुपयांचे लाईटबील परस्पर भरण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ना. धों. संमेलनात असताना महावितरणने त्यांच्या घरची वीज तोडली. कुठलीही पूर्वसूचना न देता वीजेचा मीटर काढून नेला.महावितरणने वीज तोडली, आपण साहित्य संमेलनात होतो. शेतातील घराच्या कंपाऊंडचे कुलुप तोडून महावितरणने मीटर काढून नेल्याचे महानोर यांनी सांगितले. याबद्दल ऊर्जामंत्री अजित पवारांनी महानोरांची माफी मागितली. विधान परिषदेत काँग्रेसचे आमदार मोहन जोशी यांनी याविषयी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. छगन भुजबळ यांनी यावर विधान परिषदेत स्पष्टीकरण दिले. तर उद्या सरकारतर्फे सभागृहात निवेदन सादर करण्यात येणार आहे.

close