सेनेला आणखी एक केंद्रीय पद?, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये 10 जूनला बैठक

June 3, 2016 10:07 AM0 commentsViews:

02 जून : केंद्रातल्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात 10 जून रोजी बैठक होणार आहे. यंदाच्या विस्तारात सेनेला केंद्रात आणखी एक पद मिळण्याची शक्यता आहे. 10 तारखेला सेनेची भूमिका लक्षात घेतल्यानंतर 15 जूनपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलही सीएम आणि उद्धव यांच्यात चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे.uddhav and fadanvis_new

सत्तेत आल्यानंतर भाजपने आधी राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा घेतला होता. त्यानंतर आपला मित्रपक्ष शिवसेनेला सत्तेत सामील करून घेतलं होतं. सत्तेत सामील झाल्याच्या बदल्यात शिवसेनेला राज्यात 5 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्रिपदं मिळाली होती. तसंच केंद्रात अवजड खाते मिळालं होतं. सुरुवातील अवजड खात्यावरून शिवसेनेनं उघड नाराजी व्यक्त केली होती. अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फटकारल्यानंतर शिवसेनेनं तलवार म्यान केलं होतं. आता पुन्हा एका केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे तेव्हा सेनेच्या वाट्याला कोणतं मंत्रिपद मिळतं हे पाहण्याचं ठरेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा