ठाणे विधानपरिषदेसाठी मतदानाला सुरुवात, डावखरे-फाटक यांच्यात लढत

June 3, 2016 11:38 AM0 commentsViews:

vasantrao_and_fatak03 जून :  ठाणे विधानपरिषदेच्या एका जागेसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे 1 हजार 60 लोकप्रतिनिधी मतदान करणार आहेत. एकूण 13 मतदान केंद्रांवर यासाठी मतदान होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झालीये.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे अशी ही लढत आहे. या दोन्ही उमेदवारांसाठी राज्यातले दिग्गज नेते प्रचारासाठी आले होते. या निवडणुकीत कुणाचे ‘डाव’ ‘खरे’ ठरणार…? तर कुणासाठी विजयाचे ‘फाटक’ उघडणार हे 6 जूनला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.

दरम्यान, कडेकोट बंदोबस्तात, खासगी बसमधून शिवसेनेचे मतदार नगरसेवक तहसीलदार कार्यालयात मतदानासाठी पोहचलेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे स्वत: हजर राहून नियोजन करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा