मोहन भागवत व्यस्त, खडसेंची भेट नाहीच !

June 3, 2016 12:54 PM0 commentsViews:

442802-424342-khadse03 जून : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांचा लेखाजोखा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सुपूर्द केलाय. पक्षश्रेष्ठींनी आपला निर्णय अजून गुलदस्त्यात ठेवलाय. पद वाचवण्यासाठी एकनाथ खडसे आता सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्याची शक्यता होती. पण, भागवत आज व्यस्त असल्यामुळे ही भेट होणार नाहीये.

महसूलमंत्री एकनाथ खडसे गेल्या चार दिवसांपासून आपल्या गावी मुक्ताईनगरमध्ये मुक्कामी आहे. दिल्ली घडलेल्या घडामोडीनंतर खडसे आज नागपूरला रवाना होणार होते. नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार होते. पण भागवत यांची भेट आज होण्याची शक्यता जवळपासच नाहीय. याचं कारण म्हणजे भागवत आज व्यस्त आहेत. नागपुरात संघाचा तृतीय वर्ष अभ्यास वर्ग सुरू आहे. या अभ्यास वर्गाला भागवत हजर आहे. भागवत यांनी आज दिवसभरात खडसेंना भेटीची वेळ दिली नाही. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही आज मुंबईत आहेत. त्यामुळे खडसेंची गडकरींसोबत आणि मोहन भागवत यांच्यासोबत भेट होणार नाही हे जवळपास निश्चित आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा