बच्चन-अमरसिंग यांचे मनोमिलन

March 30, 2010 8:47 AM0 commentsViews: 4

30 मार्चमहानायक अमिताभ बच्चन आणि अमरसिंग पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात आज एकत्र आले. यावेळी त्यांनी विद्यार्थांशी संवाद साधला. गेल्या तीन दिवसांपासून अमिताभ पुण्यात आहेत. पहिल्या दिवशी साहित्य संमेलनात हजेरी लावल्यानंतर पुण्यात अमिताभ वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत आहेत. विशेष म्हणजे समाजवादी पार्टी सोडल्यानंतर अमरसिंग आणि बच्चन परिवार एकत्र पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे अमरसिंग आणि बच्चन यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. पण आज या दोघांनी एकत्र येऊन 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' हेच दाखवून दिले आहे.

close