मथुरेत जमावाच्या गोळीबारात पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी शहीद

June 3, 2016 2:08 PM0 commentsViews:

mukul_devedi3दिल्ली – 03 जून : मथुरेत घडलेल्या हिंसाचारात शहराचे पोलीस अधीक्षक शहीद झाले. मुकुल द्विवेदी हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि मनमिळाऊ म्हणून प्रसिद्ध होते. जमावाने केलेल्या गोळीबारात मुकुल द्विवेदी शहीद झाले.

मुकुल द्विवेदी हे ज्या शहरात कामानिमित्त जायचे, तिथे त्यांचे अनेक मित्र व्हायचे, आणि पुढची अनेक वर्षं ते त्यांच्या संपर्कात रहायचे.. मथुरेतली त्यांची ही दुसरी वेळ होती. गेले अनेक दिवस ते या कारवाईबाबत चिंतीत होते. कोर्टाचे आदेश आल्यानंतर जवाहर बाग परिसरातून शेकडो लोकांना हटवण्याचं काम करायचं होतं.

पण गुप्तहेर यंत्रणांकडून योग्य ती माहिती मिळाली नाही, आणि आंदोलनकर्त्यांकडे इतकी शस्त्रास्त्र आहेत, हे पोलिसांना शेवटपर्यंत माहित नव्हतं. त्यामुळे पोलिसांच्या कुमकीवर जोरदार गोळीबार झाला, आणि यात द्विवेदी शहीद झाले. त्यांच्या मृत्यूमुळे पोलीस खात्यात शोककळा पसरली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा