विधान परिषद आता बिनविरोध, लाड आणि कोटक यांचा अर्ज मागे

June 3, 2016 2:25 PM0 commentsViews:

vidhan bhavan303 जून : विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांचापाठोपाठ मनोज कोटक यांनीही आपला अर्ज मागे घेतला असून निवडणूक आता बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झालंय.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी केलीये. काँग्रेसकडून नारायण राणे, राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आणि रामराजे निंबाळकर असे 3 मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत भाजपने सहा उमेदवार दिले आहे. सेनेचेही 2 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी उमेदवारी दिली आहे. तसंच प्रवीण दरेकर, आर.एन. सिंह आणि सुरजसिंह ठाकूर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. कोटक आणि प्रसाद लाड यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे आता फक्त निवडणुकीची आैपचारिक्ता बाकी राहिली असून सर्वच उमेदवार विधानपरिषदेवर गेले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा