…आणि गबरू सापडला

June 3, 2016 3:01 PM0 commentsViews:

03 जून :  डोंबिवलीत प्रोबेस कंपनीत गेल्या आठवड्यात मोठा स्फोट झाला होता. त्यात गिरी परिवराचा गबरू नावाचा कुत्रा हरवला होता. तो अखेर काल सापडला. स्फोटाच्या मोठ्या आवाजामुळे गबरू घाबरला, आणि तो पळून गेला होता.

गबरू बालाजी मंदिर येथील सौ. मोहिनी चौरसिया यांना नजरेस पडला त्यांनी ताबडतोब गबरूला घरी नेले आणि त्याची सुमारे तीन दिवस देखभाल केली आणि ‘पॉज’ या संस्थेला सांगितलं. आमचा गबरू हरवला आहे असं खरे मालक रवी गिरी यांनी ‘पॉज’ संस्थेचे संस्थापक निलेश भणगे ह्यांना हरवल्याचे सांगितले होते. मग ‘पॉज’ संस्थेने व्हॉटस्‌ऍपच्या विविध ग्रुपवर गबरुचा फोटो आणि माहिती टाकली आणि गबरू सापडल्यास संपर्क करा असं आवाहन केलं होतं. अखेर काल मोहिनी चौरसिया यांनी पॉजला फोन करून गबरूसारखाच कुत्रा आपल्याला दिसलाय, असं सांगितलं. संस्थेच्या लोकांनी लगेच तिथे जाऊन गबरूला गिरी परिवाराकडे नेलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा