बिग बँगमध्ये मुंबईकर शास्त्रज्ञ

March 30, 2010 9:10 AM0 commentsViews: 7

उदय जाधव, मुंबईयुरोपमधील सर्नमध्ये पृथ्वीच्या उत्पतीचा शोध घेणाराहाच महाप्रयोग काही वर्षांपासून सुरू होता. तो काही दिवसांपूर्वी बंद झाला होता. पण तोच आज पुन्हा सुरू होणार आहे. या प्रयोगात जगभरातील हजारांहून अधिक शास्त्रज्ञांना समावेश करण्यात आला होता. यात भारतीय शास्त्रज्ञांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यापैकीच एक आहेत डोंबिवलीच्या अनुपमा कुलकर्णी. इलेक्ट्रीकल इंजीनिअर असलेल्या अनुपमा कुलकर्णी मुंबईच्या भाभा अणुशंशोधन केंद्रात गेली 15 वर्षे शास्त्रज्ञ म्हणून संशोधन करत आहेत. युरोपमधील सर्नमध्ये जो बिग बँगचा महाप्रयोग सुरू आहे. त्या प्रयोगातही अनुपमा कुलकर्णी यांनी दोन वर्षे संशोधन केले आहे.बिग बँगच्या महाप्रयोगात शंभर मीटर खाली भुयारात उतरून तब्बल 27 किलोमीटर लांबी असलेल्या लार्ज हेड्रॉन कोलायडर मशिनवर अनुपमा कुलकर्णी यांनी काम केले आहे.पृथ्वीच्या उत्पत्तीचा शोध घेण्याच्या या प्रयत्नात भारतीय शास्त्रज्ञ सहभागी असताना त्यात महिला संशोधकही सहभागी झाल्या आहेत ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. आणि विषेश म्हणजे अनुपमा बिग बँगच्या मुख्य संरक्षण प्रणालीवर संशोधन करत आहेत. त्यांच्या या कर्तृत्वाने भारतातल्या मुलींना निश्चितच प्रेरणा मिळेल.

close