दुष्काळाचा फटका, 60 वर्षांत पहिल्यांदाच ‘पूर्णा’ कोरडीठाक !

June 3, 2016 3:57 PM0 commentsViews:

Purna nadi213

बुलडाणा -03 जून : जिल्ह्यातली पूर्णा नदी यंदाच्या दुष्काळात कोरडीठाक पडली आहे. खरंतर, कधीही न आटणारी अशी पुर्णा नदीची ओळख आहे, पण दुष्काळमुळं पुर्णा नदीचं पात्र कोरडं पडलं आहे. गेल्या 60 वर्षांत कधीच न दिसणारे पूर्णा नदीचा तळ आता दिसू लागला आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी आता वणवण सुरू झाली आहे. पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. नदीमध्ये पाणी उपसण्यासाठी नागरिकांनी मोटारी टाकलेल्या मोटारीदेखील उघड्या पडल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी म्हणून पूर्णा नदीकडे पाहिले जाते. पण यावर्षीच्या दुष्काळामुळे पूर्णा नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे. या नदीच्या पाण्यावर पिंपळगाव, पहुरजीरा, वाडी, भास्तान, माटरगाव, भेडवल, अकोला खुर्दसह गावं विसंबून होते. पण आता या गावातील नागरिक तहानले आहेत. पाणी मिळत नसल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पूर्णाही नदी 60 वर्षांत कधीच आटली नाही पण आता या नदीमध्ये दूर पर्यंत पाण्याचा थेंब देखील दिसत नाही. या नदीत नागरिकांनी मोटारी टाकल्या होत्या. त्या आधारे पाणी मिळत त्यांना पाणी मिळायचं पण टाकलेल्या ह्या मोटारी देखील उघड्या पडल्या आहेत. या वरून आपण देखील विचार करू शकता कि किती मोठा हा दुष्काळ. आता तर जिल्ह्यातील लोकांना प्रतिक्षा आहे ती पावसाची.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा