वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो प्रकल्पाला मंजुरी

June 3, 2016 7:26 PM0 commentsViews:

1

03 जून : ठाणेकरांचा प्रवास आता आणखी सुसह्य होण्याच्या दिशेने पाऊल पडलं आहे. कारण वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो 4 प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.

हा 32 किलोमीटर आणि 32 स्टेशनचा मेट्रो मार्ग असून यासाठी 14 हजार 549 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प 2021 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दीष्ट आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या मेट्रो मार्गावर एकूण 32 स्थानकांचा समावेश आहे.
कसा आहे प्रकल्प?

-एकूण लांबी 32.32 कि.मी.
– एकूण 32 स्थानके
– ओवळ्याला 30 हेक्टर जागेवर कार डेपो
– या मार्गावर 6 डब्यांची एक मेट्रो दर 3 मिनीटांनी धावणार
– अपेक्षीत प्रवाशांची संख्या 8.70 लाख
– जुलै 2021 मध्ये प्रकल्प पूर्ण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा