दुष्काळग्रस्त मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

June 3, 2016 10:21 PM0 commentsViews:

vlcsnap-2016-06-03-22h22m56s2

03 जून :  जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटात आज (गुरुवारी) मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणार्‍या शेतकर्‍याला दिलासा मिळाला असून खरीपाच्या पेरण्यांना आता वेग येणार आहे.

बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज दुपारी पावसानं दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून कोरड्या शेतीकडे पाहणारा शेतकरी या पावसामुळे सुखावला आहे. बर्‍याच दिवसानंतर त्याच्या चेहेर्‍यावर आनंद दिसला.

पुरंदरमध्ये नीरा परिसरातही आज संध्याकाळी जोराचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. आज दिवसभरात प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाचच्या सुमारास सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस पडला. तसंच बार्शीमध्येही आज दुपारनंतर दममदार पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभराच्या या पावसामुळे येथील शेतकरी सुखावला आहे. गेले काही दिवस ढगाळ वातावरणानंतर काल अर्धा तासभार पाऊस झाल्यानंतर आजच्या दमदार पावसाच्या हजेरीने सारा परिसर थंडावला आहे.

दरम्यान, दुष्काळाचा सामना करणार्‍या शेतकर्‍याच्या मनात आता नवी आशा निर्माण होत आहे. पावसाने यावर्षी धोधो बरसावं आणि बळीराजाच्या शिवारात सोनं पिकावं अशीच प्रार्थना आता सगळ्यांच्या मनात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा