लांजाजवळ जखमी बिबट्या

March 30, 2010 9:16 AM0 commentsViews: 93

30 मार्चमुंबई गोवा महामार्गावर लांजा येथे एक जाळ्यात अडकलेला बिबट्या सापडला आहे. हा बिबट्या पाच वर्षांचा आहे. शिकारीसाठी लावण्यात आलेल्या केबलच्या जाळ्यात हा बिबट्या अडकला होता. वन कर्मचार्‍यांनी त्याची सुटका केली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्या वस्तीत येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या सहा महिन्यात तीन बिबट्यांच्या इथे मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमीवाशिम जिल्ह्यातील लोहारा गावाजवळ विटा वाहणार्‍या ट्रकवर काल बिबट्याने हल्ला केला. त्यात दोघे जखमी झाले आहेत.पुलाखालच्या पाईप लाईनमध्ये आसरा घेतलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला बोलवण्यात आले होते. सहा तासांच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला पकडण्यात यश आले.

close