उस्मानाबादमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू

June 4, 2016 8:48 AM0 commentsViews:

osmanabad123

04 जून : दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याला वरुणराजाने काहीसा दिलासा दिला आहे. वादळी वारा आणि जोरदार गारपीटीसह पावसाने हजेरी लावली.

उस्मानाबाद शहरात वारा इतका सुसाट होता की, विजेचे खांब कोसळून पडले आहेत. कळंब तालुक्यातील खोंदला गावात वीज पडून एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

उस्मानाबाद शहरासह वाशी, तुळजापूर कळंब तालुक्यातही मान्सूनपूर्व पावसाने काल दुपारी हजेरी लावली. या वादळी पावसांमुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जनावरंही दगावल्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा