लाकूडतोड बंदीच्या विरोधात मोर्चा

March 30, 2010 9:45 AM0 commentsViews: 7

30 मार्चकोकणात सरकारने लागू केलेल्या लाकूडतोड बंदीच्या निर्णयाविरोधात रत्नागिरीत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व लाकूड व्यापारी, लाकूड गिरणी मालक , कात भट्टीवाले, वीट भट्टीवाले आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.पर्यावरणवादी, आणि सामाजिक संघटनांनी जंगलतोडीच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेला या सगळ्या लाकूड व्यावसायिकांचा विरोध आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 99 टक्के खाजगी मालकीचे वनक्षेत्र आहे. त्यामुळे जे सरकार कायद्यानेच खाजगी वनक्षेत्रात लाकूड तोड करायला परवानगी देते तेच सरकार जंगलतोड बंदी कसे काय लागू करते? असा सवाल या मोर्चेकर्‍यांनी केला आहे. ही जंगलतोड बंदी रद्द झाली नाही तर कोकणातील तीनही जिल्ह्यात व्यापक आंदोलन उभारण्याचा इशाराही या लाकूड व्यावसायिकांनी दिला आहे.

close