खडसे समर्थक उतरले रस्त्यावर, मुक्ताईनगरमध्ये जाळपोळ आणि रास्ता रोको

June 4, 2016 4:27 PM0 commentsViews:

जळगाव – 04 जून : एकनाथ खडसे राजीनामा देणार की नाही…यावर आठवड्याभरापासून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडलाय. एकनाथ खडसेंनी आपल्या सर्व मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. अपेक्षेप्रमाणे खडसेंचे समर्थक रस्त्यावर उतरले. मुक्ताईनगरमध्ये अघोषित बंद पाळण्यात येतोय. काही ठिकाणी जाळपोळीचा प्रयत्नही झाला.khadse_muktainagar

एकनाथ खडसे मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता निर्माण झाल्यानंतर खुद्द खडसे आपल्या होमग्राऊंड अर्थात मुक्ताईनगरला पोहोचले. खडसे सोमवारपासून मुक्ताईनगरला मुक्कामी होते. त्यांनी लाल दिव्याची गाडी वापरणे ही बंद केले होते. त्यामुळे खडसेंनी राजीनामा दिला अशी चर्चा रंगली होती. खडसेंनी मुक्ताईनगरमध्ये सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांच्या भेटीचं सत्र सुरू केलं होतं. एवढंच नाहीतर खडसेंचे समर्थक नगरसेवक आणि आमदार राजीनाम्याच्या तयारीत होते.

अखेर आज सकाळी खडसे मुंबईला पोहोचले आणि मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला. खडसेंनी राजीनामा दिल्याची बातमी धडकताच खडसेंचा मतदारसंघ मुक्ताईनगरमध्ये रास्तारोको करण्यात आला होता.

दुपारी 1च्या सुमाराला मुक्ताईनगरमधली दुकानं बंद व्हायला लागली. ठिकठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून रास्तारोकोचा प्रयत्न केला. एवढंच नाहीतर कार्यकर्त्यांनी जाळपोळ करायचाही प्रयत्न केला. पण पोलिसांच्या कारवाईमुळे ते टळलं. एखाद दोन ठिकाणी टायर जाळण्याच्या घटना घडल्या. दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोटून आणि पेढे वाटून आनंद साजरा केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा