खडसेंच्या प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करा -अशोक चव्हाण

June 4, 2016 6:01 PM0 commentsViews:

ashok chavanनांदेड – 04 जून : एकनाथ खडसेंचा केवळ राजीनामा घेऊन विषय संपत नाहीतर या सगळ्या प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीये.

खडसेंच्या राजीनामाच्या मागणीसाठी आणि एकंदर भाजप सरकारच्या विरोधात अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये आज आंदोलन करण्यात आलं.

खडसेंनी राजीनामा दिला ही आनंदाची बातमी आहे. पण नुसते राजीनामा देऊन चालणार नाही तर त्यांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी अशोक चव्हाणांनी केलीये.

दरम्यान, भाजपच्या ज्या-ज्या मंत्र्यांची प्रकरणे समोर आली. त्या सर्व प्रकरणाची न्यायलायीन चौकशी करण्याची मागणी देखील चव्हाण यांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा