मीडियामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला-अजित पवार

June 4, 2016 6:49 PM0 commentsViews:

ajit_pawar3उस्मानाबाद – 04 जून : पत्रकारांनी खडसे प्रकरणाचा पिच्छा पुरवल्याने त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलंय. ते उस्मानाबादेत बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणता 40 वर्षांच्या कारकिर्दीत माझ्यावर आरोप झाले नाही. पण मला आता मीडिया ट्रायलाचा अनुभव आला. आणि ते खरंही आहे. हे सगळं आज मीडियामुळे होऊ शकलं. आज मीडियामध्ये प्रचंड ताकद आहे. ही ताकद जनतेमध्ये आहे. जनक्षोम जर उसळला तर सरकार उलथवून लावते असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसंच मंत्र्याचा डिग्री घोटाळा, खिचडी घोटाळा, चिक्की घोटाळा असे अनेक घोटाळ्यांचे मिळून बनलेले हे घोटाळेबाज सरकार आहे. त्यामुळे आता या सरकारमधील इतर भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणीही अजित पवार यांनी दिली. तसंच शिवसेना नेहमी वाघ असल्याचा आव आणते पण भाजपने काय असं केलं की वाघाची आता शेळी झाली ते कळलं सुद्धा नाही असा टोलाही पवारांनी लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा