दिल्लीचा कोलकात्यावर विजय

March 30, 2010 9:49 AM0 commentsViews: 6

30 मार्च डीएलएफ आयपीएलमध्ये दिल्ली टीमने कोलकात्याचा 40 रन्सचा पराभव केला. आयपीएलमधील दिल्ली टीमचा हा सगळ्यात मोठा विजय ठरला आहे. मॅचमध्ये सुरुवातीच्या तीन चार ओव्हर्स सोडल्या तर दिल्ली टीमचेच वर्चस्व राहिले. दिल्लीने पहिली बॅटिंग करताना चार विकेटवर 177 रन्स केले ते डेव्हिड वॉर्नरच्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर. 177 पैकी 107 रन्स एकट्या वॉर्नरचे होते. त्याला पॉल कॉलिंगवूडची चांगली साथ मिळाली. आणि त्याने 45 बॉल्समध्ये 53 रन्स केले. त्यानंतर कोलकाता टीमची सुरुवातही खराब झाली. आणि गांगुली 5, तर मनोज तिवारी आणि मनदीप सिंग तर डकवर आऊट झाले. ख्रिस गेल आणि डेव्हिड हसी यांनी इनिंग सावरायचा प्रयत्न केला. पण अखेर वीस ओव्हर्समध्ये कोलकाता टीम नऊ विकेटवर 137 रन्स करु शकली.

close