गावकर्‍यांनी लोकसहभागातून केली दुष्काळावर मात !

June 4, 2016 9:44 PM0 commentsViews:

सोलापूर – 04 जून : करमाऴा तालुक्यातील सावडी गावच्या गावकर्‍यांना पंढरपुरात खरंतर मठ बांधायचा होता. पण गावातील दुष्काळी परिस्थिती पाहता. इथल्या गावकर्‍यांनी आपली मठासाठी साठवलेली 10 लाखांची रक्कम ही जलसंधारणाच्या कामासाठी देऊ केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सावडी गाव, खरंतर या गावचे लोक गेले कित्येक महिने दुष्काळाचा सामना करतायत. एकूण भौगलिक क्षेत्राच्या अर्धा भाग हा खडकाळ आहे. आणि इथली शेती पुर्णपणे पावसावर अवलंबून आहे. मात्र पाावसाच्या पडलेला एक थेंबही गावाच्या शिवारात थांबत नव्हता. म्हणून इथल्या गावकर्‍यांनी लोकसहभागातून वर्गणी काढून ओढ्याचं खोलिकरणाचं आणि रुंदीकरणाचं काम केलंय.

karmala3याच गावचे तलाठी श्याम वालेकर यांनी ठरवलं की जर शेत फुलवायचं असेल तर पावसाचं पाणी शिवारात थांबलं पाहिजे. आणि मुरलंही पाहिजे. त्यासाठी वालेकरांनी गावातील राजकीय गट एकत्र केले. पण आर्थिक मदत कमी पडल्यानं गावकर्‍यांनी त्यांचे देवस्थान कमिटीकडे असणारे दहा लाख रुपये या कामासाठी वर्गणी स्वरुपात दान केले.

या लोक वर्गणीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी तब्बल दहा किलोमीटरच्या ओढा खोलीकरणाचं काम पूर्ण तर केलंच..त्यासोबतच अकराव्या किलोमीटरला सुरुवात केली आहे. राज्यातील शंभरटक्के लोक सहभागातील प्रकल्प आहे. या लोकसहभागाच्या प्रकल्पाचा आदर्श जर इतर पाणीटंचाईग्रस्त गावांनी घेतला तर नक्कीच दुष्काळग्रस्त परस्थिती निर्माण होणारच नाही.

वास्तविक सावडी गावानं जे केलंय ते कौतुकास्पद तर आहेच पण तिथल्या गावकर्‍यांनी जे काम केलंय.. ते नक्कीच इतरांसाठी आदर्श आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा