विराट-अनुष्काचं ‘चोरी चोरी चुपके चुपके’ सुरूच

June 4, 2016 9:51 PM0 commentsViews:

सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांच्या सुलतान या सिनेमातल्या एका गाण्याचं शुटिंगही बुडापेस्टला होणार आहे. या गाण्याच्या शुटसाठी नुकतीच अनुष्का रवाना झाली. तिला एअरपोर्टपर्यंत सोडण्यासाठी तिचा खास मित्र विराट कोहली आला होता. त्याच्या येण्याने या दोघांमध्ये पॅचअप झाल्याच्या बातमीला पुन्हा एकदा दुजोरा मिळालाय. यापुर्वीही आयपीएल दरम्यान एका मॉलमध्ये फिरतानाचा फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाला होता. त्यानंतर आता विराट अनुष्काला सोडायला एअरपोर्टपर्यंत आल्यामुळे त्यांच्यात आता सारं काही आलबेल आहे असं वाटतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा