खडसे समर्थक 14 नगरसेवकांचे राजीनामे !

June 5, 2016 2:44 PM0 commentsViews:

khadse_ivजळगाव – 05 जून : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी दिलेल्या राजीनाम्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. जळगाव महानगरपालिकेत भाजपच्या 14 नगरसेवकांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या पक्षसदस्यत्वाचाही राजीनामाही दिला. 14 नगरसेवकांनी आपले राजीनामे आ.सुरेश भोळे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याशी असलेली निष्ठा दाखवण्यासाठी शनिवारी संध्याकाळी भाजपच्या 14 नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा महानगर जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्याकडे दिला. राजीनामा देण्यासाठी काही इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते रात्रीच्या गाडीने मुंबईकडे रवाना झाले असल्यांचं कळतंय. मात्र, भाजप गटनेते अश्विन सोनवणे, शुचिता हाडा या दोन नगरसेवकांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने भाजपमधील अंतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत की काय असा सवाल निर्माण झालाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा